Tuesday 2 March 2010

अर्थ मैत्रीचा...

मैत्री म्हणजे विश्वास
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील जगण्याचा स्वाभीमान

मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात आधाराची उणीव

मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश

मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श

मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी सुमधुर वारयाची धुन

मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकालापाणी पाजणारा मळ्यातील पाट

मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा

मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण

मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवन
मैत्री म्हणजे आयुष्यातील न सम्पणारी साठवण

Wednesday 24 February 2010

कुतूहल

लवले होते फुलुनि ताटवे नव्या वसन्तात,
चंद्र बिलोरी शिँपित होता रजताने रात.

बसलो होतो हिरवळीत गुणगुणत भावगीत,
आशा पक्ष्यांपरी उडाल्या होत्या गगनात.

तोच अचानक फुले कोठुनी पडली ओँजळभर,
आणि खोडकर तुझे हात ते आले खांद्यावर.

कलेकलेने चंद्रापरि ते प्रेमही मावळले,
शीड फिरवुनि तारु आपुले माघारी वळले.

आज पुन्हा त्या जागी येता तुटलेले धागे,
ताटव्यात या दिसती अजुनी हो अंतर जागे.

आज नसे ती व्याकुळता, ना राग ना अनुराग
विझून गेली कधीच, जी तू फुलवलीस आग.

मात्र कुतूहल केवळ वाटे वळताना पाउले,
किती जणांवर उधळलीस वा उधळशील तू फुले.....

- कवी कुसुमाग्रज