Monday 17 November 2008

मैत्री

मैत्री म्हंटली की,
आठवतं ते बालपणं आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण.

कोणी कितीही बोललं तरी कोणाचं काही ऐकायचं नाही कधीही पकडले गेलो तरी मित्रांची नावं सांगायची नाही

मैत्रीचं हे नातं सगळ्या नात्यात श्रेष्ठं,
हे नातं टिकवण्यासाठी नकोत खुप सारे कष्ट,

मैत्रीचा हा धागा रेशमापेक्षाही मऊ सूत, मैत्रीच्या कुशीतच शमते मायेची ती सूप्त भूक,

मैत्रीच्या सहवासात श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्रं मिळवण्यासाठी काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे रखरखत्या उन्हात मायेची सावली सुखाच्या दवात भिजून चिंब चिंब नाहली

मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन गालातल्या गालात हसणारे

मैत्री पाहत नाही
कोण गरीब कोण श्रीमंत
ती पाहते फक्त मित्राचं अंतरंग

मैत्री म्हणजे समाधानाने भरलेली ओंजळ
वाळवंटात जसं कधी सापडतं मृगजळ

मैत्रीच्या सहवासात अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं फुलांचही निर्माल्य होतं.
- Anonymous

काही चारोळ्या....................

एकटी स्वप्न माझी , स्वप्नातही एकटा।
एकट्यांची ही गर्दी,
या गर्दीत मी एक एकटा।
एकट्याच्या गर्दीत मी तुलाच शोधत असतो
पुन्हा डोळे मिटून मी
तुलाच पाहत असतो. . .

तुझा चेहरा ......

क्षणा क्षणाला बदलतो चेहरा तुझा....
बघेल तिथे दिसतो चेहरा तुझा।

मग अश्रूतुनी वाहतो चेहरा तुज़ा।

मी चांदण्या लिहु की चंद्र लिहु,
क्षणा क्षणाला बदलतो चेहरा तुझा।

असह्या होतात हृदयाचे ठोके,
जेंव्हा मज टाळतो चेहरा तुझा।

मी ठरवीतो तुला न आठविण्याचे,
पण राहून राहून छ्ळतो चेहरा तुझा।

हसतेस पाहून नि मग प्रेमात पाडतेस,
असं किती जनाना फसवितो चेहरा तुझा।

धुळीवर पडलो रक्त रक्त मी,
मला पाहून,हळूच पळतो चेहरा तुझा।



खोटे अश्रू नि वाहतेस फूल मजवरी,
मी मेल्यावरही खोटाच वागेल चेहरा तुझा .........

Wednesday 12 November 2008

एक संध्याकाळ.............

एक संध्याकाळ तुझ्या आठवणींची,
तुला न उमजलेल्या मैत्रीची,
एक संध्याकाल तुझ्यावर केलेल्या चारोळयांची,
शब्द शब्द जोडून व्यक्त केलेल्या प्रेमाची.............