Sunday 22 June 2008

B.V.Sc एक सजा

BVSc सारखी सजा नाही
अभ्यासाला रजा नाही
आयुष्यात आता मजा नाही
जागा आमची चुकली आहेअहो सार काही नकली आहे

आम्हाला आहेत दोनच हात
ASSIGNMENTs करतो रातोरात
शिव्या खाउन काढतो दात
लाज अब्रु विकली आहेअहो सार काही नकली आहे..........१

INTERNAL पुरता नमस्कार
बाहेर येताच शिव्या चार
हां तर म्हने शिष्टाचार
कर्तबगारी खचली आहे
अहो सार काही नकली आहे..........२

एवदी करुन दरी पार
म्हणे आमची बोथटच धार
नोकरीसाठी फिरतो दारोदार
आशा आता थकली आहे
अहो सार काही नकली आहे ...................3

कॉलेज लाइफ

"कँटीन मधला चहा आणिचहा सोबत वडा पावपैसे कुठ्ले खिशात तेव्हा उधारिच्च खात राव !
कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवूनआणि पोरींची चेष्टा करणं
एखादी चांगली तरतिला लांबूनच बघून झुरणं !
बसलोच चुकून लेक्चरला तरशेवटचा बाक ठरलेलाकुणाच्या तरी वहीतलं पानंआणि पेन सुध्दा चोरलेला !परिक्षा जवळ आलीकि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याचीम्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !
पूर्ण व्हायचं एक वर्तुळएक वर्ष सरायचंपुन्हा नव्या पाखरांसोबतजुनं झाड भरायचं।
अशी वर्तुळ भरता भरता कळलंअरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदालाफ़क्त सलाम करायचा उरला !!पुन्हा नविन रस्तापुन्हा नविन साथीजुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्याफ़क्त आठवणीच हाती !!!!!!

मैत्रीचा पाऊस

काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार नाही.
मैत्रीच्या पावसात भिजून झालोय ओला चिंब.
न्हाऊ घालतोय बघ मला शुभेच्छांचा प्रत्येक थेंब..!
मित्रांची इतकी गर्दी
भिजून बघ मला सर्दी झालीय..!

पाऊस रिमझिम हसला.
ढगांना घेउन क्षितीजावर जाउन बसला.
जाता जाता म्हणाला," काळजी नको.
भिजून घे खूप,
भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब...!

चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो, गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो....

सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....

सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे,त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....

College day's

Dr.satish cordialy welcomes You All !!!!!!!!!!!