Sunday 22 June 2008

मैत्रीचा पाऊस

काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार नाही.
मैत्रीच्या पावसात भिजून झालोय ओला चिंब.
न्हाऊ घालतोय बघ मला शुभेच्छांचा प्रत्येक थेंब..!
मित्रांची इतकी गर्दी
भिजून बघ मला सर्दी झालीय..!

पाऊस रिमझिम हसला.
ढगांना घेउन क्षितीजावर जाउन बसला.
जाता जाता म्हणाला," काळजी नको.
भिजून घे खूप,
भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब...!

चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो, गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो....

सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....

सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे,त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....

No comments: