रंकाळ्याचा वारा कोल्हापूर...
पन्हाळ्याच्या धारा कोल्हापूर...
खासबागेतील कुस्ती कोल्हापूर...
जेवल्यानंतरची सुस्ती कोल्हापूर...
चपलेपासून फेट्यापर्यंत मातीचा सुगंध कोल्हापूर...
मनानं शरीरानं आत्म्यानं बेधूंद कोल्हापूर...
मिसळीचं वाटण कोल्हापूर...
पांढ-या रश्श्यातलं मटण कोल्हापूर...
विन्या मिल्या पश्या कोल्हापूर...
पम्या पक्या दिप्या कोल्हापूर...
शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर...
राजकारणातील गेम कोल्हापूर...
शाहिरीचा बाज कोल्हापूर...
गळ्यातला साज कोल्हापूर...
मातीमधलं पसरलेलं घोंगडं कोल्हापूर...
नखशिखांत रांगडं कोल्हापूर...
ताराबाई पार्कातलं चुणचुणीत कोल्हापूर...
शिवाजी पेठेतलं झणझणीत कोल्हापूर...
क्षणोक्षणी
जिथे तिथे
भरपूर पुरेपुर
ते .... माझं कोल्हापूर
Sunday, 24 August 2008
प्रेयसी माझी एम.बी.बी.एस आहे !!!!!
तिला म्हणालो, मला आजकाल झोप येत नाहीकाय करु,
तुझी आठवण मला झोपूच देत नाही,
क्षणभर विलम्ब न करता तिने तिची पर्स उघडली,
झोपेची गोळी काढून माझ्या हातावरती दिली.......
काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे, अहो ! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.
मी म्हणालो , माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे.
रक्ताच्या प्रत्येक थेंबास, तुझ्या प्रेमाचा रंग आहे.
ती म्हणाली ,धीर धर अजुन थोडासाच उशीर आहे .
उद्या आमच्या रुग्नालयात मोफ़त रक्ततपासणी शिबीर आहे.......
काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे. अहो ! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.
मी म्हणालो , तुझ्यासाठी काहीही करु शकतो,
माझ ह्रुदय काढून, तुझ्या हाती धरु शकतो.
त्याक्षणी ती उठली, आणि आत निघून गेली.
माघारी येताना हाती"डिसेक्शन बोक्स" घेवून आली......
मित्रांनो अशी ही, माझी वेगळीच केस आहे. अहो ! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.
एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच मला लागली.
तिने तिची ओढणी,माझ्या पायावरती बांधली.
नजरेस नजर मिळवून माझ्या, हळूच ती म्हणाली. पडलास तू,पण जखम माझ्या काळजावरती झाली....

Girlfriend मैत्रीण
एक तरी मैत्रीण असावी बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग करिझ्माहून झकास दिसावी!
एक तरी मैत्रीण असावी चारचौघीत उठून दिसावी बोलली नाही तरी निदान समोर बघून गोड हसावी!
एक तरी मैत्रीण असावी कधीतरी सोबत फिरावी दोघांना एकत्र पाहून गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी!
एक तरी मैत्रीण असावी जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा एखादाच अपवाद असावा॥
एक तरी मैत्रीण असावी आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवरतिने घालावी हळूच फुंकर.
एक तरी मैत्रीण असावी जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचा सुद्धा खांदा कधी तिच्या दुःखाने भिजावा.
एक तरी मैत्रीण असावी चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे चालावं पुढे तिच्याच प्रकाशात....

काही माणसं असतात ख़ास ....
काही माणसे असतात खास
जी मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही कायम साथ देत राहातात...
काही माणसं मात्र म्रुगजळाप्रमाणे सतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या तेवढेच लांब पळत जातात....
काही माणसे ही गजबजलेल्याशहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात,
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात...
मात्र काही माणसं ही पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी
मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात...

Sunday, 3 August 2008
!!~~ मैत्री ~~!!
मैत्र! एक गोंडस नाव,
एका नात्याचं.
रम्य बालपणात; त्या वेड्या भिरभिरणाऱ्या वयात हे मैत्र किती तऱ्हांनी बागडत असतं आपल्याबरोबर, नाही?
या मैत्रीला कुठे बांधून धरून ठेवावं कळतच नाही तेव्हा.
समुद्रकाठच्या वाळूसारखी सटकून जाते ती पायाखालून.
मग वाळू सोडून नावेत बसतो आपण;
लाटांवर स्वार होण्यासाठी, एकटेच.
पण कसा कुणास ठाऊक, आहे आहे म्हणेपर्यंत रस्ता चुकतो आपला.
कायमची चुकामूक,
मग आपापल्या वाटेवरून चालत राहायचं,
एवढंच उरतं आपल्या हातात.
पण त्या मैत्रीला सुरक्षित जपून ठेवायचं काम चोख बजावतं आपलं मन आणि जसा जसा आयुष्याचा किनारा जवळ येऊ लागतो, तसातसा गहिरा होत जातो रंग त्या मैत्रीचा...

Subscribe to:
Posts (Atom)