Monday 17 November 2008

मैत्री

मैत्री म्हंटली की,
आठवतं ते बालपणं आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण.

कोणी कितीही बोललं तरी कोणाचं काही ऐकायचं नाही कधीही पकडले गेलो तरी मित्रांची नावं सांगायची नाही

मैत्रीचं हे नातं सगळ्या नात्यात श्रेष्ठं,
हे नातं टिकवण्यासाठी नकोत खुप सारे कष्ट,

मैत्रीचा हा धागा रेशमापेक्षाही मऊ सूत, मैत्रीच्या कुशीतच शमते मायेची ती सूप्त भूक,

मैत्रीच्या सहवासात श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्रं मिळवण्यासाठी काहीदा कितीतरी पावसाळे जातात

मैत्री म्हणजे रखरखत्या उन्हात मायेची सावली सुखाच्या दवात भिजून चिंब चिंब नाहली

मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन गालातल्या गालात हसणारे

मैत्री पाहत नाही
कोण गरीब कोण श्रीमंत
ती पाहते फक्त मित्राचं अंतरंग

मैत्री म्हणजे समाधानाने भरलेली ओंजळ
वाळवंटात जसं कधी सापडतं मृगजळ

मैत्रीच्या सहवासात अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं फुलांचही निर्माल्य होतं.
- Anonymous

काही चारोळ्या....................

एकटी स्वप्न माझी , स्वप्नातही एकटा।
एकट्यांची ही गर्दी,
या गर्दीत मी एक एकटा।
एकट्याच्या गर्दीत मी तुलाच शोधत असतो
पुन्हा डोळे मिटून मी
तुलाच पाहत असतो. . .

तुझा चेहरा ......

क्षणा क्षणाला बदलतो चेहरा तुझा....
बघेल तिथे दिसतो चेहरा तुझा।

मग अश्रूतुनी वाहतो चेहरा तुज़ा।

मी चांदण्या लिहु की चंद्र लिहु,
क्षणा क्षणाला बदलतो चेहरा तुझा।

असह्या होतात हृदयाचे ठोके,
जेंव्हा मज टाळतो चेहरा तुझा।

मी ठरवीतो तुला न आठविण्याचे,
पण राहून राहून छ्ळतो चेहरा तुझा।

हसतेस पाहून नि मग प्रेमात पाडतेस,
असं किती जनाना फसवितो चेहरा तुझा।

धुळीवर पडलो रक्त रक्त मी,
मला पाहून,हळूच पळतो चेहरा तुझा।



खोटे अश्रू नि वाहतेस फूल मजवरी,
मी मेल्यावरही खोटाच वागेल चेहरा तुझा .........

Wednesday 12 November 2008

एक संध्याकाळ.............

एक संध्याकाळ तुझ्या आठवणींची,
तुला न उमजलेल्या मैत्रीची,
एक संध्याकाल तुझ्यावर केलेल्या चारोळयांची,
शब्द शब्द जोडून व्यक्त केलेल्या प्रेमाची.............

Sunday 24 August 2008

माझं कोल्हापुर ....

रंकाळ्याचा वारा कोल्हापूर...
पन्हाळ्याच्या धारा कोल्हापूर...

खासबागेतील कुस्ती कोल्हापूर...
जेवल्यानंतरची सुस्ती कोल्हापूर...

चपलेपासून फेट्यापर्यंत मातीचा सुगंध कोल्हापूर...
मनानं शरीरानं आत्म्यानं बेधूंद कोल्हापूर...

मिसळीचं वाटण कोल्हापूर...
पांढ-या रश्श्यातलं मटण कोल्हापूर...

विन्या मिल्या पश्या कोल्हापूर...
पम्या पक्या दिप्या कोल्हापूर...

शिव्यांमधलं प्रेम कोल्हापूर...
राजकारणातील गेम कोल्हापूर...

शाहिरीचा बाज कोल्हापूर...
गळ्यातला साज कोल्हापूर...

मातीमधलं पसरलेलं घोंगडं कोल्हापूर...
नखशिखांत रांगडं कोल्हापूर...

ताराबाई पार्कातलं चुणचुणीत कोल्हापूर...
शिवाजी पेठेतलं झणझणीत कोल्हापूर...

क्षणोक्षणी
जिथे तिथे
भरपूर पुरेपुर
ते .... माझं कोल्हापूर

प्रेयसी माझी एम.बी.बी.एस आहे !!!!!

तिला म्हणालो, मला आजकाल झोप येत नाहीकाय करु,
तुझी आठवण मला झोपूच देत नाही,
क्षणभर विलम्ब न करता तिने तिची पर्स उघडली,
झोपेची गोळी काढून माझ्या हातावरती दिली.......
काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे, अहो ! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो , माझ्या प्रत्येक श्वासात तुझाच गंध आहे.
रक्ताच्या प्रत्येक थेंबास, तुझ्या प्रेमाचा रंग आहे.
ती म्हणाली ,धीर धर अजुन थोडासाच उशीर आहे .
उद्या आमच्या रुग्नालयात मोफ़त रक्ततपासणी शिबीर आहे.......
काय सांगू तुम्हाला,माझी वेगळीच केस आहे. अहो ! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

मी म्हणालो , तुझ्यासाठी काहीही करु शकतो,
माझ ह्रुदय काढून, तुझ्या हाती धरु शकतो.
त्याक्षणी ती उठली, आणि आत निघून गेली.
माघारी येताना हाती"डिसेक्शन बोक्स" घेवून आली......
मित्रांनो अशी ही, माझी वेगळीच केस आहे. अहो ! प्रेयसी माझी, एम.बी.बी.एस आहे.

एकदा तिच्याशी बोलता बोलता ठेच मला लागली.
तिने तिची ओढणी,माझ्या पायावरती बांधली.
नजरेस नजर मिळवून माझ्या, हळूच ती म्हणाली. पडलास तू,पण जखम माझ्या काळजावरती झाली....

Girlfriend मैत्रीण

एक तरी मैत्रीण असावी बाईकवर मागे बसावी
जुनी हीरो होंडा सुद्धा मग करिझ्माहून झकास दिसावी!

एक तरी मैत्रीण असावी चारचौघीत उठून दिसावी बोलली नाही तरी निदान समोर बघून गोड हसावी!

एक तरी मैत्रीण असावी कधीतरी सोबत फिरावी दोघांना एकत्र पाहून गल्लीतल्या सगळ्या पोरांची जिरावी!

एक तरी मैत्रीण असावी जिच्याशी निर्मळ संवाद असावा
कधीतरी छोट्या भांडणाचा एखादाच अपवाद असावा॥

एक तरी मैत्रीण असावी आयुष्याच्या अनोळखी वळणावर
तुमच्या व्यथा वेदनांवरतिने घालावी हळूच फुंकर.

एक तरी मैत्रीण असावी जिच्या मैत्रीत विश्वास रुजावा
तुमचा सुद्धा खांदा कधी तिच्या दुःखाने भिजावा.

एक तरी मैत्रीण असावी चांदणीसारखी मैत्रीच्या आकाशात
मित्रांचे दिवे मावळले म्हणजे चालावं पुढे तिच्याच प्रकाशात....

काही माणसं असतात ख़ास ....

काही माणसे असतात खास
जी मैत्रीने खांद्यावर हात टाकतात,
दुःख आले जिवनात तरीही कायम साथ देत राहातात...

काही माणसं मात्र म्रुगजळाप्रमाणे सतात,
जेवढे जवळ जावे त्यांच्या तेवढेच लांब पळत जातात....

काही माणसे ही गजबजलेल्याशहरासारखी असतात,
गरज काही पडली तरच आपला विचार करतात,
बाकीच्या वेळी ति सारी नाती विसरतात,
काही हवे असेल स्वतःला तर तुम्हाला मित्र मित्र करतात...

मात्र काही माणसं ही पिंपळाच्या पानासारखी असतात,
जाळी झाली त्यांची तरी
मनाच्या पुस्तकात आयुष्यभर जपून ठेवाविशी वाटतात...

Sunday 3 August 2008

!!~~ मैत्री ~~!!

मैत्र! एक गोंडस नाव,
एका नात्याचं.
रम्य बालपणात; त्या वेड्या भिरभिरणाऱ्या वयात हे मैत्र किती तऱ्हांनी बागडत असतं आपल्याबरोबर, नाही?

या मैत्रीला कुठे बांधून धरून ठेवावं कळतच नाही तेव्हा.
समुद्रकाठच्या वाळूसारखी सटकून जाते ती पायाखालून.
मग वाळू सोडून नावेत बसतो आपण;
लाटांवर स्वार होण्यासाठी, एकटेच.

पण कसा कुणास ठाऊक, आहे आहे म्हणेपर्यंत रस्ता चुकतो आपला.
कायमची चुकामूक,
मग आपापल्या वाटेवरून चालत राहायचं,
एवढंच उरतं आपल्या हातात.

पण त्या मैत्रीला सुरक्षित जपून ठेवायचं काम चोख बजावतं आपलं मन आणि जसा जसा आयुष्याचा किनारा जवळ येऊ लागतो, तसातसा गहिरा होत जातो रंग त्या मैत्रीचा...

Wednesday 23 July 2008

मी मराठी !!!!!!!!


मी मराठी आहे कारण 31st december ला दणक्यात celebration केलं तरी गुढीपाडव्याला घरावर गुढी ऊभारून जीभेवर कडू-गोड गोळी ची चव चाखत मनापासून नवीन वर्षाचं स्वागत करतो॥

मी मराठी आहे कारण कॉलेज मधून येताना टाइमपास मंचुरियन खाऊन आलो तरी वरण भात आणि साजूक तुपाशिवाय माझं भागत नाही॥

मी मराठी आहे कारण रिकी मार्टिन च्या गाण्यावर माझे पाय थिरकले तरी बाबूजींचे 'तोच चंद्रमा नभात' ऐकल्यावर नकळतच तोंडातून 'वाह' निघून जातं॥

मी मराठी आहे कारण frnds सोबत cool outfits घालून धम्माल पार्टी केली तरी संक्रांत दस-याला मानचा फ़ेटा आणि धोतर घालून,तितक्याच उत्साहात नातेवाईकांच्या घरी जायला मला आवडतं॥

आम्ही मराठी आहोत कारण कितीही imported cosmetics- perfumes वापरले तरी त्या typical sandal साबणा शिवाय आणि उटण्या शिवाय आमची दिवाळी साजरी होऊच शकत नाही॥

आम्ही मराठी आहोत कारण वर्तमानपत्रांनी कितीही कृत्रिम रंगाविषयी लिहिलं तरी दिवसभर मनसोक्त रंग खेळल्याशिवाय एकही होळी जात नाही॥

आम्ही मराठी आहोत कारण प्रवासाला जाताना गाडीतून एखादं मंदिर दिसलं की नकळतच आमचे हात जोडले जातात..

Sunday 22 June 2008

B.V.Sc एक सजा

BVSc सारखी सजा नाही
अभ्यासाला रजा नाही
आयुष्यात आता मजा नाही
जागा आमची चुकली आहेअहो सार काही नकली आहे

आम्हाला आहेत दोनच हात
ASSIGNMENTs करतो रातोरात
शिव्या खाउन काढतो दात
लाज अब्रु विकली आहेअहो सार काही नकली आहे..........१

INTERNAL पुरता नमस्कार
बाहेर येताच शिव्या चार
हां तर म्हने शिष्टाचार
कर्तबगारी खचली आहे
अहो सार काही नकली आहे..........२

एवदी करुन दरी पार
म्हणे आमची बोथटच धार
नोकरीसाठी फिरतो दारोदार
आशा आता थकली आहे
अहो सार काही नकली आहे ...................3

कॉलेज लाइफ

"कँटीन मधला चहा आणिचहा सोबत वडा पावपैसे कुठ्ले खिशात तेव्हा उधारिच्च खात राव !
कट्ट्यावर बसणं लेक्चर चुकवूनआणि पोरींची चेष्टा करणं
एखादी चांगली तरतिला लांबूनच बघून झुरणं !
बसलोच चुकून लेक्चरला तरशेवटचा बाक ठरलेलाकुणाच्या तरी वहीतलं पानंआणि पेन सुध्दा चोरलेला !परिक्षा जवळ आलीकि मात्र रात्री जागायच्या
डोळ्यात स्वप्नं उद्याचीम्हणून झोपाही शहाण्यासारख्या वागायच्या !
पूर्ण व्हायचं एक वर्तुळएक वर्ष सरायचंपुन्हा नव्या पाखरांसोबतजुनं झाड भरायचं।
अशी वर्तुळ भरता भरता कळलंअरे कागदच भरला !
वर्तुळ झाल्या कागदालाफ़क्त सलाम करायचा उरला !!पुन्हा नविन रस्तापुन्हा नविन साथीजुन्या रस्त्याच्या , प्रवासाच्याफ़क्त आठवणीच हाती !!!!!!

मैत्रीचा पाऊस

काल म्हटलं पावसाला,
माफ कर बाबा,
आज भिजायला जमणार नाही.
मैत्रीच्या पावसात भिजून झालोय ओला चिंब.
न्हाऊ घालतोय बघ मला शुभेच्छांचा प्रत्येक थेंब..!
मित्रांची इतकी गर्दी
भिजून बघ मला सर्दी झालीय..!

पाऊस रिमझिम हसला.
ढगांना घेउन क्षितीजावर जाउन बसला.
जाता जाता म्हणाला," काळजी नको.
भिजून घे खूप,
भिजणं थांबलं की घे पुन्हा मैत्रीचीच ऊब...!

चांगल्या मैत्रीचा ठेवा भाग्यवंतांनाच मिळतो, गर्दीतल्या थोड्यांशीच आपला सूर जुळतो....

सुरात गायलेलं मैत्रीचं गीत आयुष्याला सुरेल करतं,अशा गीताचं माधुर्य आयुष्यभर पुरुन उरतं....

सुदैवाने आपल्यातही असंच मधुर नातं आहे,त्याच्या आधाराने आयुष्य सुखात व्यतीत होतं आहे....

College day's

Dr.satish cordialy welcomes You All !!!!!!!!!!!

Tuesday 1 April 2008

Dr.satish Chougule


Mobile No. - 9960564681
5th year (B.V.Sc & A.H)
College of Veterinary And Animal Sciences , Parbhani,
Maharashtra .

Monday 17 March 2008

My College

Dr.satish exploring the world of veterinarians


Hi friends !!!!!!

!!!!! Here's Begins The new era of veterinary !!!!!