मराठी कविता
Marathi kavita collection
Tuesday, 2 March 2010
अर्थ मैत्रीचा...
मैत्री म्हणजे अभिमान
मैत्री म्हणजे जीवनातील जगण्याचा स्वाभीमान
मैत्री म्हणजे प्रेम
मैत्री म्हणजे जाणीव
मैत्री शिवाय जीवनात आधाराची उणीव
मैत्री म्हणजे विश्व
मैत्री म्हणजे आकाश
मैत्री म्हणजे तिमिरात
वाट दावणारा प्रकाश
मैत्री म्हणजे सुख दु:ख
मैत्री म्हणजे हर्श
मैत्री म्हणजे जिव्हाळ्याचा
हळुवार स्पर्श
मैत्री म्हणजे रान
मैत्री म्हणजे कोवळे उन
मैत्री म्हणजे जीव जडणारी सुमधुर वारयाची धुन
मैत्री म्हणजे खेड
मैत्री म्हणजे पायवाट
मैत्री म्हणजे पिकालापाणी पाजणारा मळ्यातील पाट
मैत्री म्हणजे तेज
मैत्री म्हणजे तारा
मैत्री म्हणजे प्रत्येकाला
हवा असणारा मोहक वारा
मैत्री म्हणजे दिलेला शब्द
मैत्री म्हणजे आन
मैत्री म्हणजे घातलेली शपथ
मैत्री म्हणजे प्राण
मैत्री म्हणजे ओढ
मैत्री म्हणजे आठवन
मैत्री म्हणजे आयुष्यातील न सम्पणारी साठवण
Wednesday, 24 February 2010
कुतूहल
चंद्र बिलोरी शिँपित होता रजताने रात.
बसलो होतो हिरवळीत गुणगुणत भावगीत,
आशा पक्ष्यांपरी उडाल्या होत्या गगनात.
तोच अचानक फुले कोठुनी पडली ओँजळभर,
आणि खोडकर तुझे हात ते आले खांद्यावर.
कलेकलेने चंद्रापरि ते प्रेमही मावळले,
शीड फिरवुनि तारु आपुले माघारी वळले.
आज पुन्हा त्या जागी येता तुटलेले धागे,
ताटव्यात या दिसती अजुनी हो अंतर जागे.
आज नसे ती व्याकुळता, ना राग ना अनुराग
विझून गेली कधीच, जी तू फुलवलीस आग.
मात्र कुतूहल केवळ वाटे वळताना पाउले,
किती जणांवर उधळलीस वा उधळशील तू फुले.....
- कवी कुसुमाग्रज
Friday, 25 September 2009
माझी एकही कविता तीला कळली नाही...
मी रागात असतांना स्वतःशीच मात्र रुसायाची
तिच्या रोजच्या गमती मला रोज सांगायची
मी त्यावर हसलो नाही तर लटकेच फुगुन बसायची
मी लिहलेली नवी कविता रोज भांडून मागायची वाचल्यावर मात्र शांतपणे माझ्याकड़े पहायची
एकदा म्हणाली ती......
तू माझ्यावर का कविता करत नाही ???
तेव्हा कळलं मला,
माझी एकही कविता तिला कळत नाही !!!
- Anonymous
Monday, 17 November 2008
मैत्री
मैत्री म्हंटली की,
आठवतं ते बालपणं आणि मैत्रीतून मिळालेलं ते खरंखुरं शहाणपण.
कोणी कितीही बोललं तरी कोणाचं काही ऐकायचं नाही कधीही पकडले गेलो तरी मित्रांची नावं सांगायची नाही
मैत्रीचं हे नातं सगळ्या नात्यात श्रेष्ठं,
हे नातं टिकवण्यासाठी नकोत खुप सारे कष्ट,
मैत्रीचा हा धागा रेशमापेक्षाही मऊ सूत, मैत्रीच्या कुशीतच शमते मायेची ती सूप्त भूक,
मैत्रीच्या सहवासात श्रम सारे विसरता येतात
पण खरे मित्रं मिळवण्यासाठी काहीदा कितीतरी पावसाळे जातात
मैत्री म्हणजे रखरखत्या उन्हात मायेची सावली सुखाच्या दवात भिजून चिंब चिंब नाहली
मैत्रीचे बंध कधीच नसतात तुटणारे
जुन्या आठवणींना उजाळा देऊन गालातल्या गालात हसणारे
मैत्री पाहत नाही
कोण गरीब कोण श्रीमंत
ती पाहते फक्त मित्राचं अंतरंग
मैत्री म्हणजे समाधानाने भरलेली ओंजळ
वाळवंटात जसं कधी सापडतं मृगजळ
मैत्रीच्या सहवासात अवघं आयुष्य सफ़ल होतं
देवाच्या चरणी पडून जसं फुलांचही निर्माल्य होतं.
- Anonymous
काही चारोळ्या....................
एकट्यांची ही गर्दी,
या गर्दीत मी एक एकटा।
एकट्याच्या गर्दीत मी तुलाच शोधत असतो
पुन्हा डोळे मिटून मी
तुलाच पाहत असतो. . .